● सर्व 25 मृतदेहांवर होणार सामूहिक अंत्यसंस्कार
● खाजगी बस पेटून 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू
बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. Buldhana accident – none of the bodies have been identified Samriddhi Highway Girish Mahajan या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने या प्रवाशांची ओळख पटणं कठीण आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघातात 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहेत.
अपघातात होरपळून मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांची ओळख पटवणे कठीण होत आहे. काही मृतदेह अर्धवट जळाले आहे तर काही पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सर्व मृतदेहाची डीएनए चाचणीचा फॉरेन्सिक अहवाल येण्यास चार ते पाच दिवस लागणार. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिकरीत्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रात्री दीड वाजेच्या सुमारास रास्ता दुभाजकाला धडकून बसने डिझेलच्या संपर्कात आल्यामुळे पेट घेतला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.तर आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले.बस मध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते.
मृत्यूचा सापळा ठरलेल्या मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपूरहून पुण्याकडे निघालेली एक खाजगी प्रवासी बस बुलढाण्याजवळ पेटून झालेल्या दुर्घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. त्यातील आठजण सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत हा अपघात झाला.
या अपघाताने सारा महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. हा महामार्ग खुला केल्यापासून दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावरच्या त्रूटी दूर कराव्यात, अशी मागणी जाणकारांकडून सातत्याने होते आहे मात्र सरकार त्या उपाययोजना कधी करणार? असा प्रश्न राज्यातून विचारला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मृतांच्या वारसदारांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
#MaharashtraBusAccident#Emergency
At least 25 passengers died in a tragic #BusAccident accident on #SamrudhiMahamarg Expressway in #Buldhana dist. Fuel tank leaked as the bus overturned.
Lightning was coming out after hitting the pole.The embers fell on the diesel and caught 🔥 pic.twitter.com/5d8kp63XOx— Kaustuva Ranjan Gupta (@GuptaKaustuva) July 1, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला ती धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.
डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. बसच्या काचा पॅकबंद होत्या. आतील प्रवाशांनी काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काचा फुटल्या नाहीत. रात्रीच्या वेळी मदत कोण करणार? बसचा दरवाजा गाडीखाली आल्यान कोणालाच बाहेर येता आले नाही. काळ आणि वेळच समोर आल्याने अशा कठीण प्रसंगात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
चालक आणि वाहक सुखरूप बाहेर पडले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुलढाणा बस अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला असण्याचाही एक शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले. त्यामुळे एक तर डिझेल टँक फुटली असावी किंवा डिझेल टँक मधून इंजनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा. त्यामुळेच बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जे लोक बचावले आहे, त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला. बसमधून २५ मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलीस अधिकारी यांच्याशी बोललो आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचं असल्याचे शिंदे म्हणाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
● असा झाला अपघात
बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कोणालाच बाहेर येता आले नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढे जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळे बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता.