● जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांचा शाप लागला
ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील पुलावर झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन 100 फुटांवरून खाली उभ्या असलेल्या इंजिनिअर्स व कामगारांवर कोसळले. मृतांमध्ये 6 इंजिनिअर्सचा व इतर कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी 2 एनडीआरएफचे टीम बचाव व शोधकार्य करत आहेत. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली एकूण 26 जण अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. 18 killed in accident in Thane; Case filed against local contractor Samriddhi Highway Shahapur
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. आतापर्यंत १८ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे. हे अद्याप अस्पष्ट आहे.
ठाण्यातील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केला. तसेच प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची व जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. सरलांबे येथे पुलाचे काम करताना गर्डर जोडणारे क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण आणखी गर्डरखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना सोमवारी रात्री 11 वाजता घडली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ठाण्यातील शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 18 जण मरण पावले आहेत. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली. एनडीआरएफचे टीम तिथे बचावकार्य करत आहे.
महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत, असे ट्विट त्यांनी केले.
ठाण्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना गर्डर कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने समृद्धी महामार्गासाठी घेतल्या त्या शेतकऱ्यांचा शाप लागला असल्याचे म्हणत राऊतांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
याप्रकरणी नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या व्ही. एस. एल. कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात शहापूर पोलीस स्थानकात कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक पोलीस आणि महामार्ग प्रशासनाच्या कामगारांनी मिळून क्रेनच्या साहाय्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले आहे. अजूनही 4 ते 5 कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्यापही बचावकार्य सुरू आहे. पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत कामगारांचे मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले गेले, हा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही.
पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन साधारण 100 फुटांवरून खाली कोसळले आहे. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पोहोचलेले आहेत. ते या अपघाताची पाहणी करत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. जुनमध्ये देखील खासगी बसचा बुलढाण्यात अपघात झाला होता. त्या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून समृद्धी महामार्गावरील अपघाताची देशभरात चर्चा सुरू आहे.