● “महाराष्ट्राचं भलं फक्त पंतप्रधान मोदी, अमित शाहाच करू शकतात”
मुंबई : राष्ट्रवादीत तसेच महाविकास आघाडीत असताना नरेंद्र मोदी, अमित शहांसह भाजपावर टीका करणारे अजित पवार आज उलट तोंडभरून कौतुक करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहे. Critic Ajit Pawar praises Prime Minister Narendra Modi Amit Shah Cooperative Department program
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. सहकार कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात असून त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार समृद्धीचा उल्लेख केला. ते म्हणाले “आज आपण पाहिले तर देश एका बाजूला अन् महाराष्ट्र राज्य एका बाजूला आहे. कारण, देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचे हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथे सर्वांना घेऊन आल्याचे’ ते म्हणाले.
पुण्यातील सहकार कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले “अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्याचं कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर प्रेम असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र-गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असे ते म्हणाले.
पुण्यात अमित शाह यांनी आज सहकार विभागाच्या डिजीटल पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी मी पहिल्यांदाच अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवे होते. यायला थोडा उशीर केला. CRCS चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजीटल असणार असल्याचे अमित शाह म्हणाले. सहकार क्षेत्र पारदर्शकतेशिवाय राहु शकत नाही, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले “शाहू फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही 22 वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही डेरिंग केलं नाही. डेरिंग फक्त अमित शाहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकारात मोठी क्रांती होत आहे”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहे. ते म्हणाले “शाहू फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही 22 वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही डेरिंग केलं नाही. डेरिंग फक्त अमित शाहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकारात मोठी क्रांती होत आहे”
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह उद्या सोमवारी (7 ऑगस्ट) राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडणार आहेत. त्यामुळे आता उद्या या विधेयकावर पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी आहे. त्यानंतर आता राज्यसभेत मंजूरी मिळणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने दिल्ली सरकारला मोठा झटका बसला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आज पुण्यातील केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. शनिवारी त्यांचे पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले. शहांच्या दौऱ्यामुळे शहरातील काही मार्गात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत.
□ अधिवेशन संपले, मंत्रालय सुट्टीवर पण अजितदादा….
नुकतेच पावसाळी अधिवेशन संपले. तसेच मंत्रालयाला सुट्टी लागली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम थांबलेले दिसत नाही. अधिवेशन संपले, मंत्रालयातही शनिवारच्या सुट्टीने शांतता पसरलेली, असे चित्र असताना सर्वसामान्यांची निवेदने आणि विकासकामांना मार्गी लावण्याचा सपाटा अजितदादांनी एक दिवसही थांबू दिलेला नाही. विश्रांती हा शब्द अजितदादांच्या डिक्शनरीतच नाही, असे म्हटले जात आहे.