● अतिरिक्त आयुक्त मोरे यांच्याकडे 15 तर कारंजे यांच्याकडे 4 विभागाची जबाबदारी
सोलापूर : महापालिकेच्या विविध विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्त असे 6 अधिकाऱ्यांसाठी सुधारीत विभाग वाटप आदेश काढले आहेत. Solapur Municipal Commissioner issued orders for the revised department allocation of 6 officers!
महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रण व पुनर्विलोकनाच्या अटीसअधीन राहून हे विभाग सोपविण्यात आलेले आहेत. दरम्यान, सुधारित आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे विविध 15 विभाग, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे चार विभाग, उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि उपायुक्त विद्या पोळ यांच्याकडे प्रत्येकी आठ विभाग, नवे उपायुक्त आशीष लोकरे यांच्याकडे एक विभाग तर नव्याने रुजू झालेले शशिकांत भोसले यांच्याकडे पाच विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
☆ अधिकारी निहाय सोपविण्यात आलेले विभाग असे –
अतिरिक्त आयुक्त (१) निखिल मोरे :
सामान्य प्रशासन विभाग, भूमी व मालमत्ता विभाग (जाहिरात परवाना, हुतात्मा स्मृती मंदिरसह), मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, वाहन विभाग, निवडणूक कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग, विभागीय कार्यालय क्र. ५ व ६, विद्युत विभाग, नगर सचिव विभाग, संगणक विभाग, विधी विभाग, अतिक्रमण विभाग, जनगणना कार्यालय, कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालय व दिव्यांग कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग आदी.
☆ अतिरिक्त आयुक्त (२) संदिप कांरजे :
सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर सुधारणा, प्रकल्प अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व ड्रेनेज विभाग, प्राणी संग्रहालय पशु वैद्यकिय विभाग, विभागीय कार्यालय क्र. ७ व ८ आदी.
☆ उपायुक्त (१) मच्छिंद्र घोलप :
सार्वजनिक आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग, सुरक्षा विभाग, अभिलेखापाल कार्यालय, यु.सी.डी. कार्यालय (एनयूएलएम सह ), क्रीडा व सांस्कृतिक विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण विभाग, विभागीय कार्यालय क्र. २ व ४,
☆ उपायुक्त (२) विद्या पोळ :
मुख्यलेखापाल, जन्म-मृत्यु विभाग व विवाह नोंदणी कार्यालय, वैद्यकीय आरोग्य विभाग (एनयुएचएम सह ), मलेरिया विभाग (आरोग्याधिकारी मार्फत), प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशाला, विभागीय कार्यालय क्र. १ व ३, भांडार विभाग (सामान्य व आरोग्य), परिवहन विभाग आदी.
उपायुक्त (३) आशिष लोकरे : मालमत्ता कर विभाग (शहर, शहर हद्दवाढ, गवसु).
☆ सहाय्यक आयुक्त शशीकांत भोसले :
सामान्य प्रशासन विभाग, मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, भूमी व मालमत्ता विभाग (जाहिरात परवाना, हुतात्मा स्मृती मंदिरसह), घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग आदी.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती
सोलापूर – शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे पद मिळाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीतील कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड करून पदभार सोपवला व तसे नियुक्तीपत्र प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना दिले.
शिवसेनेचा राज्य प्रवक्तेपदी डॉ. वाघमारे यांची निवड होताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव झाला पद मिळताच डॉ.वाघमारे यांनी कामाला सुरुवात केली. शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर यांचा नेतृत्वाखाली मोदी विभागात महाआरोग्य शिबिर घेऊन 11000 रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात त्यानंतर दहा वेगवेगळ्या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरे घेतली गेली. यामधून जवळपास दीड लाख रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला.
तसेच शहरातील सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक यादरम्यान असलेल्या व्हीआयपी रोडवर एका परप्रांतीय व्यवसायिकाने मोची नावाने दुकान थाटले होते. त्या दुकानात असलेल्या चप्पल आणि बुटांवर मोची हे नाव प्रिंट करण्यात आले होते. यावेळी हा मोची समाजाचा अवमान व अपमान आहे. म्हणून यावर आवाज उठवला व संबंधित दुकान मालकावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा, असा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले व संबंधित दुकानासमोर तीव्र आंदोलन केले.
यावेळी दुकान मालकाने मोची अक्षर असलेल्या व विक्रीस ठेवलेल्या दुकानातील सर्व चप्पल व बूट काढून टाकले.
राज्य प्रवक्ते पद मिळाल्यानंतर कमी कालावधीतच प्रा. डॉ . ज्योती वाघमारे यांच्या कामाचा धडाका पाहून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख पदाची धुरा सोपवली.
निवडीचे पत्र देताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम ताई गोरे प्रवक्त्या शितल म्हात्रे, मनीषा कायांदे, प्रवक्ते नरेश मस्के, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,युवा सेना शहरप्रमुख अर्जुन शिवसिंहवाले,भीमा वाघमारे आदी उपस्थित होते.