साेलापूर : महापालिकेच्या कुमठा नाका येथील काेंडवाड्याची क्षमता वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अतिरिक्त आयुक्त निखिल माेरे यांना दिले आहेत. पालिकेने जप्त केलेली जनावरे गाेशाळेत पाठविण्यात येतील अन्यथा जनावरांचा लिलाव जाहीर हाेणार आहे. There will be an auction of free animals; Decision of Solapur Municipal Corporation, sterilization of dogs started in Nandurbar Makta
शहरातील मुख्य रस्त्यावर माेकाट जनावरे बसलेली असतात. या जनावरांमुळे अपघात हाेण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी पालिकेकडे येतात. महापालिकेचे पथक ही जनावरे जप्त करून कुमठा नाका येथील काेंडवाड्यामध्ये आणते. जनावरांचे मालक किरकाेळ दंड भरून जनावरे घेऊन जातात आणि पुन्हा रस्त्यावर साेडून देतात. मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या करावाईतील दंड वाढविण्याचा निर्णय घेतला. ११ ऑक्टाेबरपासून छाेटी जनावरे साेडवून नेण्यासाठी २ हजार, तर माेठ्या जनावरांसाठी ५ हजार रुपये दंड हाेणार आहे. वारंवार ज्यांची जनावरे जप्त हाेतात त्या जनावरांचा जाहीर लिलाव हाेईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत जुना जकात नाका अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ समोर सोलापूर – पुणे रोड येथे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटके श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण उपक्रम राबविण्याकरीता नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार ही शासन पुरस्कृत संस्थेला उपरोक्त कामाकरिता मक्ता देण्यात आलेला आहे.
उपरोक्त काम सन 2026 पर्यत सातत्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महापालिकांनी कुत्रे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरिता महापालिके तर्फे मार्च 2024 पर्यंत सुमारे 3200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागात कुत्रे घोळक्याने फिरत असतात. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रियाअंती नंदुरबार येथील संस्थेला निर्बिजीकरणाचा मक्ता दिला आहे. कुत्र्यांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने निर्बिजीकरण व लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक म.गांधी प्राणीसंग्रहालय तसेच मक्तेदार यांच्या कडून हेल्पलाईन क्रमांक 7666513026 जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.