सोलापूर : डिसेंबर महिन्यामध्ये सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क मैदानावर रणजी सामने खेळवणार असल्याचा शब्द महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसनचे अध्यक्ष रोहित पवारांनी दिला आहे. The 28-year wait will end; Ranji matches at Park Stadium in December Rohit Pawar at Indira Gandhi Stadium Solapur यामुळे तब्बल 28 वर्षांनी या मैदानावर रणजी सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार प्रेक्षक बसू शकतात. दरम्यान, स्टेडियमवरील सामन्यांसाठी सध्या जीएसटीसह 8 हजार 400 रूपये द्यावे लागत आहेत.
२८ वर्षानंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तशी ग्वाही दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूर शहरातील पार्क स्टेडिअमवर आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील काही सामने सोलापुरात होणार आहेत. पार्क स्टेडिअमवर जवळपास २२ ते २५ हजार प्रेक्षक बसू शकतात. असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या माध्यमातून पार्क स्टेडिअमवर रणजी सामने होण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे.
३० वर्षांखालील, १९ वर्षांखालील व महिलांचे रणजी सामने होणार आहेत. त्यापैकी काही संघाचे रणजी सामने सोलापुरातील पार्क स्टेडिअमवर होणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनीही तयारी करण्याचे आम्हाला सांगितले आहे. सोलापूर शहरात राहण्याची, जेवणाची सोय व मैदानावरील सुविधा उत्तम असल्याने निश्चितपणे आपल्याला ही संधी मिळणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत रेंबुर्से यांनी दिली.