सोलापूर : काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला पक्षप्रवेशाची ऑफर आल्याचा दावा केला होता. Chandrakant Patil visited the residence of Sushilkumar Shinde for ‘this’ reason या दाव्याचे वादंग उठत असताना आज सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात भेट झाली. काही दिवसातच लोकसभेची निवडणूक असणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात ताकद आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुशीलकुमार शिंदेंसह त्यांची मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नाकारले आहे. यावर पत्रकारांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना भाजपने कोणतीही ऑफर दिली नसल्याचे म्हटले. तसेच जसे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वादळ सोलापुरात येईल तसे महाआघाडी झाड पत्त्यांसारखी पडताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नाट्य संमेलनाचे निमंत्रण दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे ते बोलत होते. ते म्हणाले, ‘माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही’, असे म्हणत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे बोलून दाखवले. ‘माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही’, असे म्हणत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे बोलून दाखवल्याचे सांगत धक्काच दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणेल. प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो, पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत. मात्र, ते दिवस निघून जातील’.
सुशीलकुमार शिंदे यांनी हा दावा केल्याने महाराष्ट्रात राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आज सायंकाळी पाचच्या सुमारास राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. तत्पूर्वी शिंदे यांनी हे विधान केल्याने भेटीला आता एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या १०० व्या विभागीय नाट्य संमेलन आयोजनाची मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्य रसिकांवर आलेली आहे. ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत. बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी भेट घेऊन नाट्य संमेलनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.