मुंबई / विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून धुमशान सुरू होण्याची शक्यता असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्रात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा वाढला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याच्या दुसर्या दिवशीच शहा महाराष्ट्रात येत आहेत. या पल्यिा यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. या दौर्यात शहा अकोला (विदर्भ) निवडणूकपूर्व बैठकीत मार्गदर्शन करतील. जळगावमधील युवा मोर्चाच्या शिबिरास संबोधित करतील. तर संभाजीनगरमध्ये बत्यामची जाहीर सभा होणार आहे.
राज्यातील भाजपाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकण्यासाठी अमित शहा यांचा दौरा असल्याचे सांगत आहे. मात्र, अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील माहयुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठीच अमित शहा येत आहेत. राज्यातील युतीच्या जागावाटपावरून काही मतभेद तीव्र स्वरूपाचे आहेत. उमेदवार जाहीर करण्यापुर्वी हा तिढा सोडवावा लागणार आहे. हा तिढा शहा आल्यानंतर सुटेल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शहा यांची अकोल्यात बैठक घेण्यात येईल. त्यात अकोला, बुलढअणा, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या मतदारसंघाचा तपशीलवार आढावा घेतील. या सर्व मतदार संघात भाजपाला युतीतील घटक पक्ष किंवा उमेदवारांशी संघर्ष असल्याचे चित्र आहे.
अमरावतीच्या जागेवर सध्या नवनीत राणा या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. या जागेवरून महायुतीतील तीनही पक्ष म्हणजे अजित पवारामची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मतभेद आहेत. राणा यांनी भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवायचे ठरवले तरी त्यांच्या जात प्रमाणपत्राचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचबरोबर शिंदेसेना या आणि बुलढाण्यातून निवडणूक लढवण्याबाबत आग्रही आहेत.
चंद्रपूरमध्ये भाजपा उमेदवार निवडण्यात अनेक अडचणी आहेत. भाजपाने राज्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी निवडणुक लढवण्याचे नियोजन केले होते. ते कोमती (ओबीसी) जातीचे आहे. पण, भाजपा नेत्यांना आता तेथ्र कुणबी उमेदवार विजयी होईल, असे वाटत आहे.
विदर्भातील दहा जागा नागपूर, भंडारा -गोंदिया, गढचिरोली, चंद्रपूर, वर्धा, रामटेक, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, वर्धा आणि अकोला या भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपाने राज्यातून 45 जागांवर विजय मिळवण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी या सर्व जागांवर विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने पाच जागांवर, सहयोगी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता.
उत्तर महाराष्ट्रात आपल्या मतदारांचा मोठा वर्ग असल्याचे भाजपा मानत आहे. त्यामुळे जळगावमध्ये युवा मोर्चाचे शिबिरात शहा मार्गदर्शन करत आहेत. जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक, धुळे, नंदूरबार, शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ सुध्दा भाजपासाठी जागावाटपासाठी डोकेदुखी बनणार आहेत. त्यात शिर्डी मतदारसंघात आपल्या उमेदवारीची टोपी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी रिंगणात फेकली आहे. 2019 मध्ये या भाजपाने सह तर सिववसेनेने दोन जागांवर विजय मिळवला होता.
मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. त्यातील संभाजीनगरची जागा शिंदेसेना आणि भाजपात वादाचा ठरणारा मतदार संघ आहे. 2019 मध्ये एमआयएमचे इप्तियाज जलील यांनी या मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. ते सध्या उध्दव ठाकरे गटाकडे आहेत. या जागेसाठी शिंदे आग्रही आहेत. तर, आपला उमेदवार अधिक चांगली कामगिरी करू शकतो, असे भारतीय जनता पक्षाला वाटते. हे सर्व मुद्दे अमित शहा यांच्या चर्चा करून सोडवले जातील, अशी खात्री या सूत्राने व्यक्त केली.
सिंधुदूर्ग रत्नागिरी जागेवरूही शिंदेसेना भाजपात तुतुमैमै सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. केवळ भाजपाच ही जागा लढवू शकते, असे त्यांनी समाजमाध्यमांत पोस्ट करून म्हटले आहे. त्याला शिंदेसेनेचे रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे, भाजपा लहान पक्षाला संपवू पहात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिरूर मतदारसंघावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत वाद सुरू आहे.
महायुतीत कोणत्याही घटक पक्षावर अन्याय होणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विजयाची क्षमता आणि वस्तुस्थिती यांचा विचार करून तीनही पक्षांना उमेदवारी देण्यात येईल, असे ते म्हणाले. गेल्यावेळी आम्ही 22 जागा लढवल्या होत्या. आता कमी जागा का स्वीकारायच्या? असा सवाल शिंदे सेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी केला आहे. तर अजित पवार यांनाही शिंदेसेने एवढ्याच जागा हव्या आहेत.