अमरावती , 9 जुलै, (हिं.स.) एका खोट्या तक्रारीत येथील नागरिक कुशल चौधरी यांच्यावर अंजनगाव सुर्जीचे तत्कालीन ठाणेदार सुधीर पाटील यांनी केलेल्या अन्यायप्रकरणी राज्य मानव अधिकार आयोगाने या सदर ठाणेदारास आठ लाख रुपये दंड तसेच लाच लूचपत गुन्ह्यात सह आरोपी करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की सन २०१८मध्ये एक केळी चेंबर्सचा विक्री व्यवहार कुशल चौधरी यांच्यासोबत झाला होता. त्या व्यवहारात पथ्रोट येथील प्रा. विनोद तिडके यांनी चेक द्वारे नऊ लाख रुपये कुशल चौधरी यांना दिले होते. त्या प्रकरणात प्रा. तिडके यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनला फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. तत्कालीन ठाणेदार सुधीर पाटील यांनी कुशल चौधरी यांना चौकशी करिता पोलीस स्टेशनला गेले होते. या दरम्यान गुन्हा दाखल व मारहाण न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी तत्कालीन ठाणेदाराने केल्याने कुशल चौधरी यांनी लासलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोला येथे सदर प्रकरणाची रीतसर तक्रार दाखल केली.
संबंधित तक्रारीची दखल लासलुजपत प्रतिबंधक कार्यालयाने घेऊन दिनांक 30 /8/ 2018 रोजी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे सदर कारल्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. तेव्हा सदर ठाणेदाराला ट्रॅप असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रा. विनोद तिडके यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची तक्रार घेऊन कुशल चौधरी यांच्या विरुद्ध भादवि ४०६, ४२० अनमोल गुन्हा दाखल करून व त्यांना हातात बेड्या घालून खिडकीला बांधून ठेवले तसेच पोलीस कोठडीत डांबून ठेवून मारहाण केली होती.
विशेष म्हणजे कुशल चौधरीलाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोला यांचा संबंधित ठाणेदार विरुद्ध तक्रार कर्ता होता आणि त्यांच्या खिशात अचलपूर न्यायालयाचे अटकपूर्व जामीन (अँटी सेफ्टी बेल) असताना आणि सदर ठाणेदाराला अटकपूर्व जामीन असल्याचे दाखविले असताना सुद्धा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून कुशल चौधरी यांच्यावर संबंधित ठाणेदाराने इंग्रज शासकाप्रमाणे अन्याय करून अपमानित केले होते. आणि हा सर्व प्रकार अंजनगाव पोलीस स्टेशनला एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील चमुची कारवाई सुरू असताना दुसरीकडे तक्रार कर्ता कुशल चौधरी यांच्यावर संबंधित ठाणेदाराचा अतिशय क्रूरपणे मोठा अन्याय सुरू होता.
हा सर्व गंभीर प्रकारअकोला येथीललाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे उपाधीक्षक संजय गोरले यांच्यासमोर घडल्याने या बाबीची अतिशय गंभीर दखल त्यावेळी उपाधीक्षक संजय गोरले यांनी घेऊन संबंधित ठाणेदाराच्या वागणुकीची व तक्रारकर्त्या सोबत केलेल्या अन्यायाची सर्व गंभीर बाबींची नोंद त्यांनी त्यांच्या अहवालात केली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांकडून राजकीय दबाव सुद्धा तपास अधिकाऱ्यावर आणल्या गेल्याची त्यावेळी फार मोठी चर्चा होती. परंतु कुठलाही दबावाला बळी न पडता उपाधीक्षक संजय गोरले यांनी अतिशय पारदर्शकपणे तपास केला होता.
या प्रकरणात एक पोलीस कर्मचारी सागर शिवणकर त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल झाला होता. माझ्यावर केलेल्या अन्यायप्रकरणी तत्कालीन ठाणेदार सुधीर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याबद्दल ची तक्रार कुशल चौधरी यांनी सतत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु एवढे मोठे गंभीर प्रकरण असताना सुद्धा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्कालीन ठाणेदार गंभीर स्वरूपाची कारवाई मात्र केली नाही.
शेवटी कुशल चौधरी यांनी दिनांक 13/ 2 /21 रोजी राज्य मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे संबंधित ठाणेदाराबद्दल तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची राज्य मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात येऊन पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयोगाने नोटीस बजावल्या होत्या. सदर प्रकरणात चार पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून आपला अहवाल राज्य मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे पाठविला होता. याप्रकरणी सर्व साक्षी पुरावे होऊन अंजनगाव सुर्जी येथील तत्कालीन ठाणेदार सुधीर पाटील यांना आठ लाख रुपये दंड आणि दंड सहा हप्त्यात तक्रार करता कुशल चौधरी यांना देण्यात यावे न दिल्यास सहा टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याचे न्यायमूर्ती एम. ए.सय्यद राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्या निकालात म्हटले आहे.
तसेच सन २०१८ मधील गुन्हा अपराध क्रमांक २३४/१८ उ/से/7.7(अ) लाच लाच लुचपत प्रतिबंधक गुन्ह्यात सह आरोपी करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिल्याने पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून आहे. एवढ्या मोठ्या दंडाची अशा स्वरूपाची कार्यवाहीची राज्यातली ही पहिली घटना असावी. मानव अधिकार आयोगाच्या या कार्यवाहीमुळे तत्कालीन ठाणेदार सुधीर पाटील यांना तातडीने सेवेतून तातडीने बडतर्फ करण्याची मागणी कुशल चौधरी यांनी पोलीस महासंचालकडे केली आहे.