Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सईकडून न्यूड फोटो शेअर करणा-या ‘वनिता’चे कौतुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

सईकडून न्यूड फोटो शेअर करणा-या ‘वनिता’चे कौतुक

Surajya Digital
Last updated: 2021/01/02 at 11:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉडी शेमिंगला नकार देत बॉडी पॉझिटिव्हीटीचा आवाज उंचावण्याबाबत जगभरात बोललं जातं. मात्र तरीही सौंदर्य आणि झिरो फिगरबाबतचे स्टिरिओटाईप्स सहज मोडून पडताना दिसत नाहीत. ते मोडून काढण्यासंबंधी अभिनेत्री वनिता खरात हिनं नुकत्याच केलेल्या फोटोशूटचं आता अभिनेत्री सई ताम्हणकर हिनंही मनमोकळं कौतुक केलं आहे.

‘कबीर सिंग’मध्ये पुष्पाचा रोल करत लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची हास्यजत्रा विजेती अभिनेत्री वनिता खरात हिनं नुकतंच रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी एक फोटोशूट केलं. दिग्दर्शक अभिजित पानसे, ऍडगुरू-अभिनेता भरत दाभोळकर आणि छायाचित्रकार तेजस नेरूरकर यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं आपल्या इन्स्टा अकाउंटवर वनिताचा हा लक्षवेधी ठरलेला फोटो शेअर करत त्यासंबंधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सई म्हणते, ‘यंदाचं हे वर्ष तुम्ही स्वतःला पूर्णांशानं स्वीकारण्याचं वर्ष आहे. स्वतःला अगदी खरोखर आणि निर्भयपणे स्वीकारा!

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वनिता खरात हिनं हा फोटो शेअर करताना तिची भूमिका सोबत मांडली आहे. ‘मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझ्यातल्या पॅशनचा, आत्मविश्वासाचा आणि अर्थातच माझ्या शरीराचाही अभिमान आहे. कारण मी म्हणजे ही अशी आरपार ‘मी स्वतः’ आहे!!!’ या भूमिकेचंही सईनं भरभरून कौतुक केलं आहे.

सोबतच तिनं वनिता खरात आणि अभिजित पानसे, भरत दाभोळकर व तेजस नेरूरकर यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ‘चला, आपण सगळेच या बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळीत सहभागी होऊ यात’ असं आवाहनही सईनं पोस्टाच्या शेवटी केलं आहे.

* स्व अस्तित्वाला सन्मान देण्याचं प्रतिबिंब

महाराष्ट्राची हास्यजत्रा विजेती अभिनेत्री वनिता खरात हिनं न्यूड फोटोत केवळ एका निळ्या पतंगाचा आडोसा घेत पोज दिली आहे. आपलं शरीर जसं आहे तसं ते मनापासून स्वीकारत, कशाचाच न्यूनगंड न बाळगता त्याला पूर्ण आनंदानं साजरं करण्याचा संदेश वनिता यातून देते आहे. तिच्या स्वतःच्या देहाला आणि स्व अस्तित्वाला सन्मान देण्याचं प्रतिबिंब या फोटोत सुरेख उतरलं आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #सईकडून #न्यूडफोटो #शेअर #करणा-या #वनिताचे #कौतुक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article औरंगाबादचा जुना वाद पेटलाय, त्यात अहमदनगरच्या नामांतराची मागणी
Next Article नवी मुंबई विमानतळ नामांतरावरुन मनसे – शिवसेना समोरासमोर येणार

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?