Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेत संसदेवर हल्ला, गोळीबारात 4 ठार, पराभव स्वीकारण्यास ट्रम्पंचा नकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

अमेरिकेत संसदेवर हल्ला, गोळीबारात 4 ठार, पराभव स्वीकारण्यास ट्रम्पंचा नकार

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 10:54 AM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात 4 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात काहीजण जखमीही झाले आहेत. ट्रम्प व त्यांचे समर्थक राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल मान्य करण्यास तयार नाहीत. तर  अमेरिकन काँग्रेसमध्ये जो बायडन यांच्या विजयावर अखेरचा शिक्कामोर्तब होणार आहे.

अमेरिकेत काल बुधवारी मोठा हिंसाचार झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मान्य करण्यास नकार देत व निकाल रद्द करावा, अशी मागणी करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाखो समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला केला.

कॅपिटल बिल्डिंगमधील काचा फोडल्या. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येथे 2700 पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे. आम्ही कधीही हार मानणार नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान ट्रम्प यांचे लाखो समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी तोडफोड केली. ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला. ट्विटर सुरक्षा टीमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स मागे घेत नाहीत, किंवा डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन कॅपिटल भवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली होती. समर्थक आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार झटापट झाली.

कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वॉशिंग्टनच्या नॅशनन मॉलमध्ये आपल्या समर्थकांशी संवाद साधला होता. निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

याच्या काही तासांनंतरच अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीबाहेर आणि आत हिंसाचाराला सुरुवात झाली आणि ट्रंप यांनी एका नव्या व्हीडिओ संदेशाद्वारे आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला.
तर या व्हीडिओमध्ये निवडणूक विषयक दावे करण्यात आले असल्याने आपण तो हटवत असल्याचं युट्यूबने म्हटलंय.

ट्विटरवरून हा व्हीडिओ सुरुवातीला काढून टाकण्यात आला नव्हता. पण हा व्हीडिओ रिट्वीट, लाईक आणि त्यावर कॉमेंट करण्याचा पर्याय बंद करण्यात आला होता. पण नंतर ट्विटरवरूनही हा व्हीडिओ हटवण्यात आला.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि संसद भवनात मोठा धुडगूस घातला. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.

यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.जवळपास चार तास ही झटापट सुरु होती. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केलं आहे’ असं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील, असंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं. पोलीस आपल्या बाजूने आहेत. आपला पक्ष कायद्याने चालणारा आहे, मला कुठलाही हिंसाचार नको, असं ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटलं.

* बायडन यांच्याकडून शांततेचं आवाहन

संविधानाचं रक्षण करत अमेरिकेत उफाळलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय वाहिनीवरुन समर्थकांना शांततेचं आवाहन करावं, असं वक्तव्य अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी केलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रंप समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

बायडन म्हणाले,  लोकशाही अप्रत्यक्षरित्या धोक्यात सापडली आहे. मी राष्ट्रपती ट्रंप यांना अपील करतो, त्यांनी टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करत लोकशाहीचं रक्षण केली पाहिजे. कॅपिटलमध्ये जबरदस्तीने घुसून खिडक्या तोडणं, प्लोअरवर येणं आणि गोंधळ करणं याला विरोध नाही हिंसाचार म्हणतात.

* ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक

कॅपिटॉल बिल्डिंगमधल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट लॉक केलंय. तर सर्मथकांना आवाहन करणारा त्यांचा व्हीडिओही काढून टाकण्यात आलाय. तर इव्हांका ट्रंप यांनी हिंसक समर्थकांना देशभक्त म्हणणारं ट्वीट नंतर डिलीट केलं.

निवडणुकीविषयी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट्समुळे त्यांचं अकाऊंट 12 तासांसाठी लॉक करण्यात करण्यात आलंय. त्यामुळे आता पुढचे 12 तास ट्रम्प यांना ट्वीट करता येणार नाही.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे.

* ट्रम्प यांचा व्हीडिओ हटवला

या कारवाईसोबतच ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबवरून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा एक व्हीडिओ काढून टाकण्यात आलाय. आंदोलकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार केल्यानंतर ट्रंप यांनी त्यांच्यासाठी एक संदेश दिला होता. समर्थकांनी घरी परतावं असं आवाहन त्यांनी यात केलं होतं, पण सोबतच निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याच्या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला होता. या व्हिडिओमुळे हिंसाचार कमी होण्याऐवजी तो वाढेल अशी शक्यता असल्याने आपण हा व्हीडिओ काढून टाकत असल्याचं फेसबुकने म्हटलंय.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #अमेरिकेत #संसदेवर #हल्ला #गोळीबारात #4ठार #पराभव #स्वीकारण्यास #ट्रम्पंचा #नकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईतील नाईट कर्फ्यू आजपासून उठविला, मुंबई पोलिसानी केले जाहीर
Next Article एकत्र जगता येत नसल्याने किमान एकत्र तर मरू म्हणत प्रेमी युगलाची आत्महत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?