मुंबई : दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. त्या ब्लॉग मध्ये त्यांनी आपली तब्येत बिघडल्याची माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेची माहिती देखील त्यांनी ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. तसेच, बिग बीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया, मी लिहू शकत नाही’.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या साता समुद्रा पार पसरलेली आहे. अभिनयातले बिग बी आणि खऱ्या आयुष्यातील बिग बी हे दोन्ही पात्र चाहत्यांच्या फार जवळचे आहेत. पण आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. बिग बींची परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.
महत्त्वाचं म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं ब्लॉकच्या माध्यमातून सांगत त्यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. बिग बीचं हे छोटं वाक्य चाहत्यांच्या मनातील चिंता वाढवत आहे. त्यामुळे आता चाहते बिग बींच्या पुढच्या ब्लॉगच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, बिग बी आपल्याला ‘चेहरे’, ‘झुंड़’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहेत.