Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेता अजय देवगनची गाडी रोखणाऱ्या शेतकरी आंदोलकाला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेता अजय देवगनची गाडी रोखणाऱ्या शेतकरी आंदोलकाला अटक

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 11:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता अजय देवगनची गाडी रोखणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यावर हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने ट्विट केले होते. नंतर अनेक कलाकारांनी ट्विट केले. अजय देवगननेही ट्विट केले होते. त्यामुळे अजय देवगनची गाडी गोरेगाव येथे एकाने रोखली होती.

दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाची धग आता बॉलीवूडपर्यत आली आहे. त्याचा फटका काही कलाकारांना बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रख्यात अभिनेता अजय देवगणला त्यावरुन एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी काही कलाकारांनी सोशल मीडियावर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ठोस भूमिका घेतली होती. त्यात अक्षय कुमार, कंगणा राणावत, दिलजीत दोसांज, स्वरा भास्कर, तापसी पन्नु यांच्याशिवाय काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचाही समावेश होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याचाच आज अजयला प्रत्यय आला. एका शेतकरी आंदोलकानं अजयची कार अडवली. आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. तो अजयला म्हणाला की, तु शेतक-यांच्या आंदोलनाविषयी काही बोल. मात्र अजयनं त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांनी ते प्रकरण मिटवले. अजय त्यावेळी आपल्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निघाला होता. त्याचवेळी एकानं त्याची कार अडवून त्याला शेतकरी आंदोलनाविषयी आपली प्रतिक्रिया विचारली होती. त्या व्यक्तीचे नाव राजदीप सिंह असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आज मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली होती. मुंबईतील दिंडोशी भागातील एका ठिकाणी त्याच्या चित्रपटाचे शुटिंग चालू आहे. त्याचवेळी त्याची कार अडविण्यात आली होती. सोशल मीडियामध्ये प्रसिध्द झालेल्या फोटोमध्ये अजय आपल्या कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी राजदीप नावाचा व्यक्ती त्याच्याशी बोलताना दिसत आहे. त्याचे म्हणणे असे होते की, देशभर शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली असताना तुम्ही त्यावर काहीच का बोलत नाही. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे हा प्रकार सुरु होता. अखेर पोलिसांनी त्याच्यावर कलम 341, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांना याप्रकाराची माहिती कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अजयला पोलिसांनी चित्रिकरणाच्या ठिकाणी सोडले. त्यानंतर त्यांनी राजदीप नावाच्या व्यक्तीला अटक केली. अजयनं अशावेळी त्या आंदोलनात भाग घेतला होता जेव्हा पॉप स्टार रिहानानं त्या आंदोलनावरुन व्टिट केले होते.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Farmeragitator #arrested #blocking #actor #AjayDevgan's #car, #अभिनेता #अजयदेवगनची #गाडी #रोखणाऱ्याला #शेतकरीआंदोलकाला #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जनता बँक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा
Next Article नोटाबंदीमुळे देशात बेरोजगारी सर्वोच्च स्तरावर – डॉ. मनमोहन सिंग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?