मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे आज गुरुवारी निधन झाले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका बसला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. अनेक मालिकांमध्ये झळकलेला सिद्धार्थ बिग बॉसमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. अलिकडेच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही झळकला होता. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे.
आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
मेडिकल अहवाल आणि पोस्ट मॉर्टम अहवाल समोर येईल आणि त्याचप्रमाणे त्याच्यासह राहणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई पोलिसांची टीम आणि एसआरपीएफची तुकडी कूपर रुग्णालयात पोहोचली आहे. अगदी कमी वयात सिद्धार्थने यशाचं शिखर गाठलं होतं. मालिका, वेबसीरिज त्याचप्रमाणे विविध अल्बममध्ये त्याने त्याच्या अभिनयाची छाप उमटवली होती. त्याचं असं अचानक जाणं सर्वांसाठीच धक्कादायक होतं.
12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता ‘बालिका वधू’ मालिकेच्या माध्यमातून मिळाली.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे आज मुंबईत निधन झाले. ‘बाबुल का आंगन छुटे ना’ ‘बालिका वधू’ या मालिकांमध्ये त्याने भूमिका केली. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘दिल से दिल तक’, ‘बिग बॉस 13’, ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी 7’ यामध्येही सिद्धार्थ झळकला. सावधान इंडिया, इंडियाज गॉट टॅलेंट हे शो त्याने होस्ट केले होते. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात सिद्धार्थने भूमिका साकारली होती.