बार्शी : सवतीला नांदू दिले नाही. तिला पळवून लावले, याचा राग मनात धरुन बायको ( wife ) रात्री (night) झोपेत असताना तिचा गळा दाबून खून केल्याचे सिध्द झाल्याने लक्ष्मण जगू शिंदे (रा. नांदूर ता. केज जि. बीड) यास येथील सत्र न्यायालयाने (court) जन्मठेपेची व 25 हजार रु दंडाची व दंड (penalti) न भरल्यास सहा महिने (six months) सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
12 जून 2018 रोजी ही घटना घडली होती. जुलै 2018 पासून आरोपी तुरुंगात आहे. वैराग पोलीस (virag police ) ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र (Indictment) दाखल केले होते. आरोपीने आज न्यायालयात न्यायाधीशांसोबत उध्दट वर्तन ( Rude behavior) केले. त्यास वकिल नेमावयाचा आहे काय? शिक्षेबाबत काय म्हणणे आहे? अशी विचारणा केल्यावर त्याने उध्दटपणे उत्तर देत फाशीची ( Execution) शिक्षा द्या, असे म्हणत आरडाओरडा केला.
अतिरिक्त सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी हा निकाल (result) दिला. सरकार पक्षातर्फे ऍड. दिनेश देशमुख यांनी काम (work) पाहिले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
वैराग येथील डॉ. शिरीष भूमकर यांच्या शेतामध्ये विहीरीचं काम करण्यासाठी लक्ष्मण शिंदे आपल्या कुटुंबासह आला होता. त्याच्यासोबत त्याच्या सासुरवाडीचीही मंडळी होती. शेतात पाल ठोकून ते रहात होते. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण शिंदे याने पत्नी सविता हिस अंधारात ठेवून मुरुड तालुक्यातील एका मुलीबरोबर विवाह (marriage) केला होता.
हा विवाह उघडकीस आल्यानंतर सविता हिने त्या मुलीला नांदू दिले नाही, तिला पळवून लावले. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप वादावादी ( Controversial) झाली होती. दुसर्या पत्नीच्या माहेरकडील मंडळीलाही लक्ष्मण शिंदे हा विवाहित (married)) असल्याचे माहिती नव्हतं. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याने ते ही नाराज ( Angry) झाले होते. दुसरं लग्न फसल्याचा व त्याचा झालेला खर्च वाया गेल्याचा त्याला राग होता. त्यामुळे नवरा-बायकोत वारंवार भांडण (Frequent quarrels) होत होते. त्यानंतर सविता रात्री झोपेत असताना तिचा गळा दाबून (By pressing the throat ) तो फरार झाला.
पहाट (Dawn) झाल्यानंतर आपली मुलगी उठली नाही. नात बराच वेळ रडत आहे, म्हणून शेजारीच पालात राहणारी तिची आई (mother) सविता हिच्या पालात आली. तिने सविताला उठविण्याचा प्रयत्न केला असता ती उठली नाही. त्यामुळे तिला संशय (Doubt) आला. सविताच्या गळ्याजवळ दाबल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे तिने आरडाओरडा केला. तेव्हा सविताचा खून झाल्याचे उघड झाले. स.पो.नि. धनंजय ढोणे यांनी फरार (Absconding) शिंदे यास शिताफीने पकडले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी 11 साक्षीदार तपासले. गुन्हा घडला तेंव्हा आरोपी आणि मयत हे दोघेच पालात होते हे सिद्ध झाले. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा ( Evidence) आणि वैद्यकीय अधिकारी (Medical officer) यांची साक्ष (Evidence) महत्वाची ठरली.