Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘अमृत’पालातील विष : भिंद्रनवाले 2.0; …. अन् अचानक अंगात भिंद्रनवाले शिरला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशब्लॉग

‘अमृत’पालातील विष : भिंद्रनवाले 2.0; …. अन् अचानक अंगात भिंद्रनवाले शिरला

Surajya Digital
Last updated: 2023/04/02 at 2:37 PM
Surajya Digital
Share
10 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)ॲड.  राजकुमार नरूटे(संकलन आणि संपादन )

स्वतंत्र खालिस्तानची मागणी करत नावात अमृत असले तरी कृतीतून विष ओकणार्‍या अमृतपालने सध्या पंजाबमध्ये धुमाकूळ घातला आहे. स्वत:ला प्रचंड धर्माभिमानी आणि जर्नलसिंग भिंद्रनवाले यांचा कट्टर अनुयायी समजणार्‍या अमृतपालने पुन्हा एकदा स्वतंत्र खलिस्तानची मागणी पुढे रेटली आहे. त्यासाठी अत्यंत आक्रमक आणि तितकीच हिंसक ‘वारीस पंजाब दे’ नावाची संघटना तयार केली आहे. Poison in ‘Amrit’pala : Bhindranwale 2.0; …. And suddenly Bhindranwale entered Punjab Khalistan Operation Blue Star

 

काही महिन्यांपूर्वी या संघटनेने पंजाबमधील एका पोलीस ठाण्यावरच हल्ला करून आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवली होती. तेव्हाच हा विषारी किडा खुडून काढला असता तर आज तो पंजाबची डोकेदुखी ठरला नसता. मात्र त्याच्या कारवायांमुळे एकेकाळी देशाची डोकेदुखी बनलेली खलिस्तानी चळवळ पुन्हा एकदा पंजाबमध्ये वळवळ करत असल्याचे पुढे आले आहे. त्यास अनुसरून खलिस्तानी चळवळ नेमकी आहे तरी काय? ती कधी सुरू झाली? आता पुन्हा ती चळवळ का सुरू झाली? अशा अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करून देणारा लेखनप्रपंच आजच्या ‘संडे मॉर्निंग’मधून खास ‘सुराज्य’च्या वाचकांसाठी.

स्वतंत्र खलिस्तानची आक्रमक मागणी करणारा जर्नलसिंग भिंद्रनवाले हा कट्टर धर्मवेडा होता. तो धर्माच्या डोहात आकंठ बुडालेला होता. पण स्वत:ला भिंद्रनवालेचा अनुयायी समजणारा अमृतपाल हा तसा भुरटा. तो धर्माभिमानी किंवा धर्मवेडा वगैरे असे काही नाही. तो काही महिन्यांपूर्वीपर्यंत दुबईमध्ये पडेल ती कामे करून गुजराण करणारा सामान्य माणूस. त्यावेळी तो अंगावर शीख धर्माची प्रतिकेसुध्दा वापरत नव्हता. पण वेगळे काही अचाट करून दाखवण्याचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले आणि अचानक त्याच्या अंगात भिंद्रनवाले शिरला आणि तो अमृतपाल झाला. त्यानंतर त्याने गेल्या सप्टेंबर महिन्यात शीख धर्माची संथा घेतली. तिथून तो स्वतंत्र खलिस्तानचा फूत्कार सोडू लागला.

● खालिस्तान म्हणजे काय?

खलिस्तान हे शिखांच्या काल्पनिक देशाचे नाव आहे. पंजाबी भाषेतील ‘खालसा’ या शब्दावरून खलिस्तान हे नाव पुढे आले. खलिस्तान म्हणजे ‘खालसाची भूमी’ असा अर्थ सांगितला जातो. अर्थात शीख धर्मीयांचा स्वतंत्र देश म्हणजे खलिस्तान. याच स्वतंत्र खलिस्तानसाठी पंजाबमध्ये जी चळवळ उभी राहिली, त्या चळवळीला खलिस्तानी चळवळ असे म्हटले जाते. 1970 ते 1980 या काळात पंजाबमध्ये शीख समुदायाचा एक स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती.

○ खलिस्तान चळवळीची पार्श्‍वभूमी

दि.31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरमध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात मोतीलाल नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या मागणीला बॅ.महम्मद अली जिना यांची मुस्लीम लीग, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील गट आणि मास्टर तारासिंह यांचा शिरोमणी अकाली दल या देशातील तीन गटांनी विरोध केला होता. शिखांसाठी स्वतंत्र देश असावा; अशी तारासिंग यांची मागणी होती.

 

दि.15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्तान स्वतंत्र झाला. पण देशाला स्वातंत्र्य देत असताना इंग्रजांनी देशाची फाळणी केली. त्या फाळणीतून पाकिस्तान हा स्वतंत्र देश निर्माण झाला. त्यावेळी अखंड असणार्‍या पंजाबचे दोन तुकडे झाले. एक तुकडा पाकिस्तानमध्ये गेला आणि दुसरा तुकडा भारतात राहिला. काही शीख धर्मीय पाकिस्तानातच राहिले. काहींना स्वत:चे घरदार, जमीनजुमला सोडून भारतात यावे लागले. रक्ताच्या नात्यातील काहींची कायमचीच ताटातूट झाली. फाळणीचा हा प्रकार शीख धर्मीयांना अजिबात रुचला नाही. त्यातूनच शीख धर्मीयांच्या स्वतंत्र देशाची म्हणजेच खलिस्तानची मागणी पुढे आली. या मागणीने पुढे देशात दहशतवादाचे रूप धारण केले. पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बिअंतसिंग, जनरल अरूणकुमार वैद्य यासारख्या अनेक महत्त्वाच्या अस्तींचे त्यात बळी गेले. या मागणीने जणू देशाविरुध्द युध्दच पुकारले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ खलिस्तानची मागणीची कारणे

1.स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करताना पंजाबमधील काही भाग हा पाकिस्तानात गेला. त्या भागात
पंजाबमधील लोकांच्या पूर्वजांच्या जमिनी होत्या.
2. आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांनी आपल्यासाठी ठेवून गेलेल्या जमिनी असलेला भाग पाकिस्तान देशात गेल्यामुळे काही शिखांनी पाकिस्तान देशातच वास्तव करायचे ठरवले. त्यामुळे शीख बांधवांची ताटातूट झाली.
3. फाळणीचे तत्त्व न पटल्यामुळे निर्माण झालेला राग, असंतोष आणि नाराजी यामधून स्वतंत्र खलिस्तानची मागणी पुढे आली.

○ पंजाबी सुभा आंदोलन

देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी 1947 साली पंजाबमध्ये ’पंजाबी सुबा आंदोलन’ सुरू झाले. तब्बल 19 वर्षे हे आंदोलन चालले. अखेर 1966 मध्ये इंदिरा गांधींनी ही मागणी मान्य केली. इंदिरा गांधी सरकारने पंजाबचे तीन भाग केलेे. पंजाब शिखांसाठी, हरियाणा हा हिंदी भाषिकांसाठी आणि चंदीगड हा तिसरा भाग होता. त्यावेळी चंदीगडला पंजाब आणि हरियाणा या दोन्ही देशांची राजधानी बनवण्यात आली होती. आजही पंजाब आणि हरियाणामध्ये राजधानीबाबत वाद सुरू आहे.

 

○ जगजीत सिंह चौहान

 

पंजाबमध्ये 1969 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात स्वतंत्र खलिस्तानवादी जगजीत सिंह चौहान हे तांडा विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत उभे होते. मात्र त्यांचा पराभव झाला. निवडणूक हरल्यानंतर जगजीत सिंह चौहान ब्रिटनमध्ये गेलेे आणि त्यांनी तेथे त्यांनी खलिस्तान चळवळ सुरू केली. 1971 मध्ये जगजीत सिंग चौहान यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये खलिस्तान चळवळीसाठी निधी देण्याची मागणी करणारी जाहिरातही दिली होती. जगजीत सिंग 1977 मध्ये भारतात परतले आणि 1979 मध्ये पुन्हा ब्रिटनला गेले. येथे जाऊन त्यांनी ’खलिस्तान नॅशनल कौन्सिल’ची स्थापना केली.

○ आनंदपूर साहिब ठराव मंजूर

1966 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने शिखांसाठी वेगळे राज्य केले. त्यामुळे पंजाबमध्ये काही वर्षे शांतता होती, पण 1973 मध्ये अकाली दलाने पंजाबला अधिक अधिकार देण्याची मागणी मांडली. प्रथम 1973 मध्ये आणि नंतर 1978 मध्ये अकाली दलाने पंजाबला अधिक अधिकार देण्यासंदर्भातील ठराव आनंदपूर साहिब ठराव पास केला. केंद्र सरकारला केवळ संरक्षण, परराष्ट्र धोरण, दळणवळण आणि चलन यावर अधिकार असावेत, इतर सर्व बाबींवर राज्य सरकारचा अधिकार असावा, अशी सूचना या ठरावात करण्यात आली. या ठरावात पंजाबला अधिक स्वायत्तता म्हणजेच अधिक अधिकार द्यावेत, असे म्हटले होते. यात वेगळ्या देशाची चर्चा नव्हती.

 

○ जर्नलसिंग भिंद्रनवाले

दि. 13 एप्रिल 1978 रोजी अकाली कार्यकर्ते आणि निरंकारी यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात 13 अकाली कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर फ्युरी डे साजरा करण्यात आला. त्यात जर्नलसिंग भिंद्रनवाले यांनी भाग घेतला. पंजाब आणि शिखांच्या मागणीवर भिंद्रनवाले यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी ठिकठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यास सुरुवात केली. यावरून पंजाबमध्ये हिंसक घटना वाढल्या.

1981 मध्ये पंजाब केसरीचे संस्थापक आणि संपादक लाला जगत नारायण यांची हत्या झाली. एप्रिल 1983 मध्ये पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक ए.एस. आटवाल यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. याच काळात पंजाब रोडवेजच्या बसमधील अनेक हिंदूंना मारण्यात आले. पंजाब अशांत झाल्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील कॉंग्रेस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली. या काळात या हिंसाचाराला जबाबदार असणारा भिंद्रनवाले अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसला. शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरालाच त्याने हिंसक आंदोलनाचे केंद्र बनवले.

○ पेटता पंजाब

पंजाबमधील वाढत्या हिंसक घटनांसाठी भिंद्रनवालेला जबाबदार धरण्यात आले होते. मात्र, त्याच्याविरुद्ध अपुर्‍या पुराव्यामुळे अटक होऊ शकली नाही. पंजाबमधील वाढत्या हिंसक घटना रोखण्यासाठी भिंद्रनवाले यांना अटक करणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारने ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ सुरू केले. या ऑपरेशनचे लष्करी कमांडर मेजर जनरल के.एस. ब्रार यांचा विश्‍वास होता की, काही दिवसांत खलिस्तानची घोषणा होणार होती आणि ती थांबवण्यासाठी ही कारवाई लवकरात लवकर पार पाडणे आवश्यक होते.

○ ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू

भिंद्रनवाले याला संपवणे आता आवश्यक बनले होते. त्यासाठी इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार करण्याचे आदेश भारतीय लष्काराला दिले. 1 जूनपासून लष्कराने सुवर्ण मंदिराला वेढा घातला. रेल्वे गाड्या जागेवरच थांबवण्यात आल्या. बससेवा बंद करण्यात आली. फोन कनेक्शन तोडले गेले. विदेशी माध्यमांना राज्य सोडण्याच्या सूचना दिल्या गेल्या. दि.3 जून 1984 रोजी पंजाबमध्ये संचारबंदी लावण्यात आली. 4 जूनच्या संध्याकाळी लष्कराने गोळीबार सुरू केला. सैन्याची चिलखती वाहने आणि रणगाडेही दुसर्‍या दिवशी सुवर्ण मंदिरात पोहोचली. भयंकर रक्तपात झाला. दि. 6 जून रोजी भिंद्रनवाले याला लष्कराने कंठस्नान घातले. या कारवाईत 83 जवान शहीद तर 249 जखमी झाले. त्याच वेळी, 493 अतिरेकी किंवा नागरिक मारले गेले आणि 86 लोक जखमी झाले. 1592 लोकांना अटक करण्यात आली.

 

○ इंदिरा गांधींची हत्या

 

ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा देशात विपरीत परिणाम झाला. शीख समाजात असंतोष पसरला. देशात ठिकठिकाणी केंद्र सरकारचा निषेध सुरू झाला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामे दिले. भिंद्रनवाले संपला तरी पंजाबमधील परिस्थिती निवळली नाही. किंबहुना बिघडली. या ऑपरेशननंतर चारच महिन्यांनी म्हणजे दि.31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचेच शीख अंगरक्षक असणारे सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी हत्या केली. त्यांच्या शरीरावर असंख्य गोळ्या झाडून शरीराची चाळण केली.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधी दंगली उसळल्या. दिल्लीत तब्बल 2733 शिखांची हत्या शिरकाण करण्यात आली. देशभरात 3,350 पेक्षा अधिक शिखांची कत्तल करण्यात आली.

○ भिंद्रनवालेच्या हत्येचा बदला

दि. 23 जून 1985 रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाचे विमान हवेत असतानाच अचानक स्फोट झाला. विमानातील सर्व 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र काही दिवसांनी बब्बर खालसा या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. भिंद्रनवालेच्या हत्येचा बदला घेतला असे बब्बर खालसाने त्यावेळी सांगितले.

○ वैद्य यांची हत्या, मुख्यमंत्र्यांना उडवले

10 ऑगस्ट 1986 रोजी ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली. खलिस्तान कमांडो फोर्सने याची जबाबदारी घेतली. 31 ऑगस्ट 1995 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या कारसमोर एका आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला उडवले. यामध्ये बेअंत सिंग यांचा मृत्यू झाला.

 

 

✍️ ✍️ ✍️

ॲड.  राजकुमार नरूटे

(संकलन आणि संपादन )

You Might Also Like

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान

पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट

मसुद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर ठार

नौदलाच्या ताफ्यात ‘अर्नाळा’ पहिली पाणबुडी विरोधी युध्‍दनौका दाखल

TAGGED: #Poison #Amritpal #Bhindranwale2.0 #suddenly #Bhindranwale #entered #Punjab #Khalistan #OperationBlueStar #indragandhi, #पंजाब #अमृतपाल #विष #भिंद्रनवाले #2.0 #अचानक #अंगात #भिंद्रनवाले #शिरला #खालिस्तान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article use masks चैत्री वारीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचे 4 रुग्ण, मास्कचा वापर करण्याचे आवाहन
Next Article सोलापूर । ग्रीनफिल्डवरचा शेतकरी भांडून भांडून वैतागला

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?