Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ कुमार, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ कुमार, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

admin
Last updated: 2025/04/04 at 12:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 4 एप्रिल (हिं.स.)।हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज शुक्रवारी (दि. ४) मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मनोज कुमार यांच्या निधनाच्या वृत्ताला रुग्णालयाचे सीईओ आणि कार्यकारी संचालक डॉ. संतोष शेट्टी यांनी दुजोरा दिला आहे.

अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली.देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना नवी ओळख मिळाली. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले. ‘मेरे देश की धरती’ या त्यांच्या गाण्याचे स्वर कानावर पडताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. या अभिनेत्याने आज जगाचा निरोप घेतला आहे.

मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. २४ जुलै १९३७ रोजी हरियाणातील करनाल येथे त्यांचा जन्म झाला. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

You Might Also Like

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे
Next Article फोर्सवन’चे प्रमुख एडीजी कृष्णप्रकाश यांनी घेतली बैठक

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?