अकलूज -पूर्वीच्या भांडणावरून पाठीमागुन दुचाकीला मोटारीने धडक देत कोयता लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बागेचेवाडी (ता. माळशिरस) येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकलूजच्या पोलिसांनी ७ जणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अजय राजू खाजेकर (वय 32 रा.आंबेडकर नगर अकलूज ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी विजय संजय खंडागळे, नवनाथ किसन साठे,सुरज रणदिवे,नितीन खंडागळे,यश खंडागळे (सर्व रा.महर्षी कॉलनी अकलूज ) आणि अन्य दोन अनोळखी इसम अशा ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अजय खाजेकर हे शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास माळशिरस कोर्टाचे काम आटोपुन आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घराकडे निघाले होते.त्यावेळी बागेचेवाडी शिवारातील पाटील वस्तीजवळ पाठीमागून वरील आरोपींनी नंबर नसलेल्या व्हॅगनार मोटारीने त्यांना दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर वरील सर्वांनी त्यांना तू लय माजलय ? तुला मस्ती आली असे म्हणत खल्लास करण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास फौजदार खारगे करीत आहेत .