Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिल्पाने घेतला घटस्फोटाचा निर्णय? सोशल मीडियावरील पोस्टवरून चर्चा बळीचा बकरा बनवलं जात आहे – कुंद्रा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शिल्पाने घेतला घटस्फोटाचा निर्णय? सोशल मीडियावरील पोस्टवरून चर्चा बळीचा बकरा बनवलं जात आहे – कुंद्रा

Surajya Digital
Last updated: 2021/09/19 at 4:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी घटस्फोट घेण्याची शक्यता आहे. शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून तिने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. आपण नवीन पद्धतीने पुढे जाऊ शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो, आपण वर्तमानात एक नवीन सुरुवात करून त्याला एक नवा अंत देऊ शकतो, असा या पोस्टमध्ये उल्लेख आहे.

पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राने मुंबईतल्या कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आपल्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे, असा आरोप त्याने केला आहे. क्राइम ब्रांचने राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पॉर्न फिल्म बनवण्यासंदर्भात आपल्याविरोधात एकही पुरावा नाही, असा दावाही राज कुंद्राने केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर सध्या केस सुरू आहे. डर्टी पिक्चर प्रकरणात त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिल्पा साक्षीदार होणार असल्याची चर्चा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिल्पा राजला घटस्फोट देणार की नाही यावर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. शिल्पाने एका पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाचा इशारा करते का अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. लोक या पोस्टला शिल्पा शेट्टीच्या घटस्फोटाच्या निर्णयाचे लक्षण असल्याचं म्हणत आहेत. शिल्पा शेट्टीने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुस्तकाचे पेज शेअर केलं. या पानावर ‘वाईट निर्णय’ यावर एक दृश्य दर्शवते. एवढेच नाही तर ‘वाईट निर्णया’सह आणखी एक शब्द बोलला गेला आहे, तो म्हणजे ‘ब्रांड न्यू एंडिंग’. चाहत्यांनी याच शेवटच्या शब्दामुळे शिल्पा घटस्फोटाच्या तयारीत तर नाही ना अशी शंका व्यक्त केली.

* नेमके काय म्हटलंय, ठरवा तुम्हीच

‘घेतलेले वाईट निर्णय, आपण केलेल्या चुका, आपल्याकडून दुखावलेले मित्र यांचे विश्लेषण करण्यात आपण बराच वेळ घालवू शकतो. फक्त हुशार असतो, अधिक धैर्यवान किंवा फक्त चांगले असतो तर. आता कितीही सांगायला गेलं स्पष्टीकरण द्यायला गेलं तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही.’

‘मात्र आपण नव्या मार्गांनी पुढे जाऊ शकतो. अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. जुन्या चुका सुधारू शकता आणि आपल्या लोकांसाठी आपण चांगले बनू शकते. भविष्याला तुमच्या मतांनुसार करू शकता असंही पुढे म्हटलं आहे. शिल्पाच्या या पोस्टमुळे ती घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत शिल्पाने अधिकृतपणे सध्यातरी कोणताही खुलासा केला नाही. चाहत्यांनी ती घटस्फोट घेऊ शकते, असा या पोस्टवरून अंदाज लावला आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Shilpa #decides #divorce #Discussion #post #socialmedia #scapegoat #Kundra, #शिल्पा #घटस्फोटाचा #निर्णय #सोशलमीडिया #पोस्ट #चर्चा #बळीचाबकरा #कुंद्रा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आजपासून पुन्हा आयपीएलचा रोमांच
Next Article सोलापुरातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या झाल्या बदल्या

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?