सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्याही वाढू लागलेली असून ,आज एकाच दिवसात सांगली जिल्ह्यामध्ये 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 905 वर पोहचली आहे. आज तिघांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या 905 वर पोहोचली आहे तर तिघांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आज उपचाराखाली 486 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आज अखेर बरे झालेले रुग्ण संख्या 435 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 29 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 18 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आज जिल्ह्यात तीन रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत.
आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 579 असून, आज अखेरची शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 79 अशी आहे. महापालिका क्षेत्रातील आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 292 आहेत. मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या वाढू लागल्याचे चित्र समोर येत आहे.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 79, जत 106 ,कडेगाव 50, कवठेमहांकाळ 25 ,खानापूर 27, मिरज 60 , प्लस 61, शिराळा 147 ,तासगाव 26, वाळवा 77, महानगरपालिका क्षेत्र 292 अशी आहे.