कनोज : उत्तरप्रदेशमध्ये रविवारी सकाळी आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहून मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे.
ही घटना कनोज जवळील सौरिख पोलीस स्टेशन क्षेत्रात घडली. बस ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ती बस कार ला जाऊन धडकली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. यामुळे या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.
अपघातामधील जखमींनी कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती. दरम्यान, कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं महामार्गावरून खाली येऊन पडली.
अपघातानंतर बसमधील प्रवाशांच्या आराडा-ओरडीचा व किंकाळ्यांचा आवाज ऐकताच, आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. नंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात झालेली बस दिल्लीवरून बिहारला जात होती. सौरिख क्षेत्रात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अनर्थ झाला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे कानोजच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.