तुळजापूर : बांबू घेऊन सोलापूर मार्गे चालेला ट्रक तुळजापूर घाटात पलटी होऊन अपघात झाला. या घटनेत सिंदफळकडून येणारा दुचाकी स्वार रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सिंदफळहून तुळजापूर कडे दुचाकी (एम एच २५ ए क्यु १८१५) वरून मनोज सुभाष शिंदे (वय २९, सेवानिवृत्त बस चालक) विश्वंभर किसनराव कुलकर्णी (वय ६० , दोघे रा. सिंदफळ ता तुळजापूर) हे तुळजापूर घाटात एस वळणावरुन जात होते. याचवेळी तुळजापूर मार्गे सोलापूर कडे बांबू घेऊन जाणारी ट्रक (एम एच १७ बी डी ७००४) ही पलटी झाल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले. त्या दोघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वैद्यकीय उपचारादरम्यान सेवानिवृत्त बस चालक विश्वंभर किसनराव कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. मनोज सुभाष शिंदे यास जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ट्रक पलटी होताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. सिंदफळ गावात अपघाताची घटना समजताच ग्रामस्थांनी घाटात धाव घेऊन मोठी गर्दी केली.