इराण – इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. इराणमध्ये शनिवारी एका दिवसात 2 लाख 71 हजार 606 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एवढंच नाही तर इराणमध्ये आणखी साडेतीन कोटी लोक करोना पॉझिटिव्ह होऊ शकतात, अशी धक्कादायक शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आत्तापर्यंत अडीच कोटी नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन 14 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणखी 3 ते साडेतीन कोटी लोकांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे, अशीही भीती त्यांनी बोलून दाखवली. सध्याच्या घडली 2 लाख लोक रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असेही रुहानी यांनी स्पष्ट केले.
जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. जगभरातल्या अनेक देशांत कोरोनाची लाखो जणांना बाधा झाली आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त अमेरिकेतल्या नागरिकांना कोरोनाची बाधा झालीये. मात्र इराणमधल्या 2 कोटी 50 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती इराणच्या राष्ट्राध्यक्षांनीच दिली आहे.
इराणमध्ये आणखी 3 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भिती देखील इराणच्या राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे.तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. यासंबंधीचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
* अमेरिकेतही कोरोनाचा स्फोट
अमेरिकेत 36 लाख 80 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 1 लाख 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातल्या अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. तर आता इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील परिस्थिती किती भीषण आहे याचाही अंदाज आलेला आहे.