सोलापूर : आज रविवारी आलेल्या प्रशासनाच्या कोरोना अहवालात सोलापूर शहर हद्दीत 486 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. आज 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता सद्यस्थितीत शहरात एकूण पॉझिटिव्ह 3804 तर कोरोना मृत्यूचा आकडा 325 वर गेला आहे. आज तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
शहरातील 588 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी 102 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर व्ही.एम. मेडिकल सोसायटीतील 75 वर्षीय महिलेचा, विजयपूर रोडवरील कमला नगरातील 34 वर्षीय पुरुषाचा आणि आसरा परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णांची एकूण संख्या तीन हजार 804 झाली असून मृतांची संख्या 325 झाली आहे.
* नवे रुग्ण आढळून आले
– रेल्वे लाईन फॉरेस्ट, रेसिडेंट डॉक्टर क्वार्टर, थोबडे वस्ती (देगाव नाका), बुधवार पेठ, निलम नगर (एमआयडीसी), आदित्य नगर (विजयपूर रोड), टिळक नगर, रामवाडी, उत्तर सदर बझार, बेडर पुलाजवळ, विष्णू मिल चाळ, जम्मा वस्ती, हनुमान नगर, वर्धमान नगर, बाळे, गीता नगर, अंबिका नगर (नई जिदंगी), रेवणसिध्देश्वर नगर, मजरेवाडी, रेल्वे सोसायटी, स्वागत नगर, भूषण नगर, डफरीन चौक, आरटीओ ऑफिसजवळ, विजापूर नाका, गांधी नगर, वैष्णवी नगर (सैफूल), ईश्वर नगर (अक्कलकोट रोड), मुरारजी पेठ, अरविंदधाम, कमला नगर, पश्चिम मंगळवार पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, भवानी पेठ, राहूल नगर, कुमठे, मोदीखाना, विडी घरकूल, एमआयडीसी, होटगी रोड याठिकाणी आज नवे रुग्ण आढळून आले आहेत.