बार्शी : खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या दणक्यामुळे आज तहसीलदार प्रदीप शेलार यांचा पदभार काढून निवडणूक शाखेचे तहसीलदार डी.एस. कुंभार यांच्याकडे सोपविण्यात आला.
रविवारी सोलापूर येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत खा. निंबाळकर यांनी तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बार्शी शहर व तालुक्यात मुंबई-पुणे इतर शहरातून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात यावे, अशा सूचना खा. निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यात वारंवार दिलेल्या भेटीदरम्यान तहसीलदार यांना दिल्या होत्या.
मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणूंच्या वाढत्या रुग्णाला तहसीलदार हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी निंबाळकर यांनी केली होती. त्यानुषंगाने आज विभागीय आयुक्त, पुणे यांनी प्रदिप शेलार यांचा पदभार काढून घेऊन डी.एस.कुंभार यांच्या कडे दिला आहे.