नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून टीकात्मक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी आपली शक्तिशाली असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. आज त्यांची मोठी ताकद पण, भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे’ असं म्हणत राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावर मोदींच्या भूमिकेवर टीका केली आहे.
‘चीनने सुरु केलेला सीमावाद हा पूर्वनियोजित आहे. हा वाद भारताच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्यासाठी आहे. ते विशिष्ट प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते जे काही करत आहेत, तर तो आहे प्रतिमेवर हल्ला.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी आपण बलवान असल्याची खोटी प्रतिमा निर्माण केली. अशी प्रतिमा निर्माण करणे हीच देशाची मोठी कमजोरी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवरुन व्हिडिओची एक मालिकाच सुरु केली आहे. आजही गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे बलवान असल्याची आपली देशांतर्ग प्रतिमा संवर्धन करण्या मश्गूल आहे. त्याचा फायदा चीनने घेतला आहे, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला आहे की, चीनच्या आगळीकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्युत्तर देणार की देशांतर्गत आपली प्रतिमा जपण्यासाठी शस्त्र खाली ठेवणार? दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर स्वत:च देत म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर दबावाखाली आहे आहेत.’
राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्न विचारले आहेत, चीन ही प्रत्येक पाऊल ठरवून टाकतो. चीनच्या या आगळीकीबद्दल पंतप्रधान मोदी काय करणार आहेत? ते चीनचा सामना करतील? चीनच्या आव्हानाचा सामना करतील आणि दाखवून देतील मी भारताचा पंतप्रधान आहे, मी माझ्या प्रतिमेची चिंता करत नाही. मी तूमचा सामना करतो असे चीनला ठणकावून सांगतील की शस्त्र खाली ठेवतील? असा सावल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
“मला चिंता वाटते की, पंतप्रधान मोदी हे दबावाखाली आहेत. चीन आपल्या भूभागात आला आहे आणि पंतप्रधान मोदी जाहीरपणे सांगत आहेत की चीनने घुसखोरी केली नाही. यावरुनच स्पष्ट कळते की पंतप्रधान मोदी हे आपल्या देशांतर्गत प्रतिमा संवर्धनासाठी चिंतीत आहेत. म्हणूनच ते स्वतःचा बचाव करत आहेत”
– राहुल गांधी, खासदार, काँग्रेसचे नेते