सांगली : जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 31 नवीन रुग्ण, व ग्रामीण मध्ये 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज उपचाराखाली 598 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आजअखेर बरे झालेले रुग्ण 489 आहेत. जिल्ह्यात 37 रुग्णांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 24 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. आज 4 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत.
शिराळा जत वाळवा आणि आटपाडी अग्र क्रमांकावर असले तरी मनपा क्षेत्राने 362 रुग्णसंख्या वर आलेले आहे. आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यातील दिघंची ,माडगुळे, ,अंकले ,शिरढोन ,केरेवाडी , विटा ,अंकली , नांद्रे ,बांबवडे ,गवळेवाडी , वाटेगाव , रोजे वाडी ,आणि मनपा क्षेत्रातील आहेत.
आजचे मृत्यू झालेले रुग्ण बांबवडे पलूस येथील 70 वर्षांची महिला , वाळवे गल्ली मिरज येथील 58 वर्षांचा पुरुष शिवाजी नगर मिरज 19 वर्षांचा मुलगा ,खणभाग सांगली 58 वर्षांचा पुरुष, या सर्व चिंताजनक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी 22 जुलै ते 30 जुलै लॉकक डाऊन जाहीर केला आहे.
* ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 628 ,शहरी भागातील 84 ,आणि मनपा क्षेत्रातील 362 ,आहे
* तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे.
आटपाडी 82 , जत 107 , कडेगाव 51, कवठेमहांकाळ 29, खानापूर 35 ,मिरज 73 , पलूस 67 ,शिराळा 157 , तासगाव 28 ,वाळवा 83 ,मनपा 362 अशी आहे.