सोलापूर : सोलापूर शहरातील काल रविवारी राञी बारापर्यंत 100 व्यक्तींचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. त्यामध्ये 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील 19 हजार 243 व्यक्तींची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन हजार 835 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 327 जणांचा मृत्यू झाला आहे.
* या ठिकाणी रुग्ण आढळले
शहरातील लक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), दक्षिण सदर बझार, रेल्वे लाईन, जयभवानी सोसायटी (अंत्रोळीकर नगर), ईएसआय क्वार्टर, बेघर सोसायटी, पापाराम नगर (विजयपूर रोड), विडी घरकूल (हैदराबाद रोड), पुना नाका, रविवार पेठ, बुधवार पेठ, खडक गल्ली (बाळे), भवानी पेठ, बनसिध्द नगर (सोरेगाव), आत्मविश्वास नगर, लक्ष्मी नगर (होटगी रोड), साठे चाळ (बुधवार पेठ) आणि माधव नगर (आकाशवाणी रोड) या ठिकाणी हे 29 रुग्ण आढळून आले आहेत.