सोलापूर : सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आज दुर्दैवाने दोन हजाराची संख्या कोरोनाग्रस्तांनी पूर्ण केली आहे. आज तीन मृत्यू तर नव्याने 147 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
ग्रामीण भागातील एक हजार 606 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 147 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता रुग्णसंख्या दोन हजार 140 झाली आहे. बाणेगाव, कान्हापुरी व किणी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 48 झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटीत एक तर किणीत तब्बल 15 रुग्ण सापडले आहेत. करमाळ्यातील अळसुंदे येथे एक तर माढ्यातील रिधोरे येथे आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढ्यातील सबजेलमध्ये एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील भुसार गल्लीत एक, साठे नगरात तीन, सोमराय नगरात दोन, कामती बु. येथे एक रुग्ण आढळला आहे. माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे चार रुग्ण तर सांगोल्यातील निजामपूर येथे पाच रुग्ण सापडले आहेत. तसेच दक्षिण सोलापुरातील होनमुर्गीत एक, कासेगावात 20, बसवेश्वर नगरात एक, मंद्रूप येथे आठ, मुळेगाव तांडा येथे एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील ईसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी मंदिराजवळ, काशी कापड गल्ली, लक्ष्मी नगर, मनिषा नगर, उमडे गल्ली, भातंबरे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर लक्ष्मी टाकळीत 18, भोसे येथे दोन, संत पेठेत दोन, पोलिस लाईनला चार, महावीर नगरात दहा रुग्ण सापडले आहेत.