सांगली : शिराळा व धरण परिसरात असणाऱ्या गावातील पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शिराळा तालुक्यात मोरणा मध्यम प्रकल्प भरला असून साडंव्यातून पाणी वाहू लागले आहे. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते तर आठ दिवस बंद असते. मोरणा धरणात पाण्यावर 495 हेक्टर ऊस तर 438 हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्र भिजते.
मोरणा धरणातील पाण्यावर शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगांव, मांगले गावातील शेतीला फायदा होतो. शिराळा शहराला व शिराळा एमआयडीसी पाणीपुरवठा होतो. दरवर्षी
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणात व तेथून पुढे मोरणा धरणात येत आहे.
तालुक्यात मोरणा, करमजाई, अंत्री, व टाकवे धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. चांदोली धरणात पाणीसाठा 21.55 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 61.55 टक्के भरले आहे.