बार्शी : बार्शीतील युवा उद्योजकाने दोन राज्यात सर्वाधिक बिझनेसचा पुरस्कार पटकावून तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रविण नवनाथ कसपटे असे या उद्योजकांचे नाव असून ते मधुबन ट्रॅक्टर्स या फर्मचे संचालक आहेत.
जागतिक पातळीवर ट्रॅक्टर निर्मितीत अग्रेसर असलेल्या जॉन डीअर कंपनीची मधुबन ट्रॅक्टर्स ही बार्शी व उस्मानाबाद जिल्ह्यातील वितरक फर्म आहे. या फर्मला गुजरात-महाराष्ट्र या दोन राज्यात पतपुरवठा सेवेत सर्वाधिक व्यवसाय आणि महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवेबद्दल प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाला.
कंपनीच्या ऑनलाईन झालेल्या परिषदेत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. कंपनीचे महाराष्ट्र-गुजरात या दोन राज्यांचे विभागीय व्यवस्थापक संजय भट्ट, महाराष्ट्राचे प्रदेश व्यवस्थापक अंकित सक्सेना यांनी या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मधुबन ट्रॅक्टर्सची प्रशंसा केली.
यावेळी दोन राज्यातील कंपनीचे वितरक परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मधुबन ट्रॅक्टर्सचे संचालक प्रविण नवनाथ कसपटे यांचा गौरव करण्यात आला.
गेले एक तप मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी सेवा देत आहे. ट्रॅक्टर विक्री, पतपुरवठा आणि विक्री पश्चात तत्पर सेवा यामुळे मधुबनने परिसरातल्या बळीराजाचा विश्वास संपादन केला आहे. यापूर्वी देखील मधुबनला अनेक विभागातील उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार मिळाले आहेत. मधुबनच्या या यशाबद्दल प्रविण कसपटे यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.