सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 57 नवीन रुग्ण, शहरी भागात 5 नवीन रुग्ण, ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळून आले आहेत. सर्व मिळून आज तब्बल 95 रुग्णांची भर पडल्याने सांगलीतील कोरोना रुग्णसंख्या दीड हजार पार झाली आहे. आज दुर्देवाने चौघांचा कोरोनाबळी झाले आहेत.
आता जिल्ह्याची रुग्णसंख्या 1हजार 545 वर पोहोचली आहे. तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 754 आहे. आणि उपचाराखाली 743 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 48 रुग्ण आजअखेर मृत्यू पावले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 19 रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. तसेच 41 रुग्ण कोरोना मुक्तही झालेले आहेत.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 731, शहरी भागातील 123, मनपा क्षेत्रातील 691 अशी आहे. शिराळा, जत, आटपाडी, रुग्ण संकेत अग्र क्रमांकावर असले तरी मनपा क्षेत्रानेही 691 चा आकडा ओलांडला आहे.
आजचे नवीन पॉझिटिव्ह आटपाडी मधील तडवळे, पत्रे वाडी येथील, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील हरिपूर, भोसे, अंकली, खंडेराजुरी येथील आहेत. पलूस, खटाव, शिराळ्यातील वाकुर्डे व गवळेवाडी, आणि तासगावातील बस्तवडे, मांजर्डे, व वाळवा तालुक्यातील आष्टा, कोरेगाव, येलूर, व सांगली मिरज मनपा क्षेत्रातील आहेत.
आजच्या चार मृतांमध्ये समडोळी मिरज येथील 78 वर्षांचा पुरुष, तासगाव चिंचणी येथील 75 वर्षांची महिला, दिंडी वेस मिरज येथील 64 वर्षांची महिला, मिरज येथील 62 वर्षांचा पुरुष अशी आहे.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या –
मनपा 691,वाळवा 96, तासगाव 37, शिराळा 174,पलूस 77,मिरज 93,खानापूर 43, कवठेमहांकाळ 53,कडेगाव 54,जत 116, आटपाडी 111 अशी आहे.