नवी दिल्ली : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून काँग्रस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपत्तीच्या स्थितीतही केंद्रातील मोदी सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे नफेखोरी केली, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी ट्विट करून केला होता. यालाच गोयल यांनी उत्तर दिले आहे.
देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचं काय झालं? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत, असं उत्तर पियुष गोयल यांनी एका ट्विटमधून दिलं आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
राहुल गांधींनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात एक ट्विट केले होते. ज्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. रोगराईचे ढग दाटलेत, नागरिक संकटात आहेत. तर कामवण्याची हीच संधी आहे. याचा फायदा उचलून गरीबविरोधी सरकारने नफेखोरीचे केली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला. राहुल गांधी यांनी श्रमिक ट्रेन संदर्भातील एका बातमीला टॅग करत हे ट्विट केले. या रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी राहुल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.
लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी चालवलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनच्या तिकीटाबाबत राहुल गांधींनी भाष्य केले आहे. स्थलांतरीत मजुरांकडून सरकार रेल्वे तिकीटाचे पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यावेळी विरोधकांनी सरकारला घेरले होते. केंद्र सरकार मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा ८५ टक्के खर्च करत आहे, असं उत्तर सरकारने विरोधकांना दिलं होतं. यावरुन नक्की मजुरांचे पैसे कोण भरले याबाबत ठोस उत्तर मिळू शकले नाही. प्रत्येकजण आपण सोय केल्याचा दावा करीत आहे.