सांगली : शिराळा तालुका हा पावसाळी प्रदेश असल्यामुळे या भागातील वारणा व मोरणा या नद्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. एनडीआरएफ टीमने याबाबत संभाव्य स्थितीचा आढावा घेऊन कोकरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी यांना पूरस्थितीबाबत प्रशिक्षण आयोजित केले होते.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत असते. यामुळे बऱ्याच वेळा दुर्धर प्रसंग ओढवलेले आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणांची ही संख्या आहे. त्यामुळे या विभागात तसेच वारणा काठ हा परिसर नेहमी पूरर्स्थितीला तोंड देत असतो. पुरेशा प्रशिक्षणाअभावी या स्थितीला तोंड देणे शक्य होत नाही. त्यामुळेच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
या प्रशिक्षणात एनडीआरएफ टीमने सहभाग घेतला होता. मोरणा धरण येथे हे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये कोकरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. कदम, पोलीस कर्मचारी, तसेच शिराळा नगरपंचायतीचे कर्मचारी, पाणीपुरवठा अभियंता शरद पाटील, प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील, लक्ष्मण मलमे, मुनिर लगरदार, तात्यासाहेब कांबळे उपस्थित होते. या सर्वांना एनडीआरएफ टीमने प्रशिक्षण दिले.