बार्शी : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वृध्दांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने चिरडून मृत्यू झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील चिखर्डेे येथे घडली आहे. याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महानंदा दत्तू कोंढारे (वय 65) आणि सुशिला माधव पाचकवडे (वय 70) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. त्या चिखर्डे येथील रहिवाशी आहेत.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
चिखर्डे गोरमाळे रस्त्यावर एक कि.मी. अंतरावर हा अपघात झाला. धडक जेारात बसल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. या रस्त्यावर फारशी वाहतूक नसते. तसेच सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ नाही. तरीदेखील हा अपघात झाला आहे.