सोलापूर : सोलापूर शहरात आज सोमवारी कोरोनाचे नव्याने 144 रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील मृत्यूचे प्रमाण घटले आहे. सोमवारी 2हजार 909 अहवाल निगेटिव्ह तर 144 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 67 पुरुष तर 77 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 707 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 778 तर महिला 1 हजार 929 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 348 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 228 तर महिला 120 रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 3047 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2903 अहवाल निगेटिव्ह तर 144 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
आतापर्यंत 30 हजार 745 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 25 हजार 780 आहे. तर 4 हजार 707 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1500 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 859 आहे.
आज मृत पावलले व्यक्ती तीन व्यक्ती सिध्देश्वर पेठ परिसरातील 72 वर्षाचे पुरूष, रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षाचे पुरूष, मेरगु टॉवर सुत मिल परिसरातील 50 वर्षाचे पुरूषाचा समावेश आहे.