सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहेत. सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 154 नव्या रूग्णांची भर पडली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 2 हजार 972 झाली आहे तर मृतांची संख्या 82 झाली आहे. सोमवारी वाढलेल्या 154 रूग्णांमध्ये सर्वाधिक 61 रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले आहेत. तर पंढरपुरातील आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली, मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगर, बार्शीतील सर्जापूर, गिरणी चौक, नाईकवाडी प्लॉट, तर अकलूजमधील दत्त चौकातील एका अशा 7 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
* तालुकानिहाय रूग्ण संख्या
– अक्कलकोट 442 बार्शी 701, करमाळा 80, माढा 127 माळशिरस 142, मंगळवेढा 83, मोहोळ 206, उत्तर सोलापूर 228, पंढरपूर 401, सांगोला 45, दक्षिण सोलापूर 540.