सोलापूर : तक्रारदाराच्या पत्नीची आरोग्य सेविकापदी तात्पुरती नेमणूक करण्यासाठी आणि त्यासाठी वरिष्ठांकडे फाईल पोहचवण्यासाठी 40 हजारांची लाच घेणार्या आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रभारी अधिकारी अलीसाहेब अ. रजाक शेख आणि वरिष्ठ सहाय्यक कुमार नागप्पा बसमुंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
तक्रारदाराने आपल्या पत्नीला आरोग्य सेविकापदी तात्पुरती नेमणूक करण्यासाठी आरोग्य विभागातील अलीअहमद रजाक शेख आणि वरिष्ठ सहाय्यक कुमार बसमुंगे यांची भेट घेतली. या कामासाठी दोघांनी तक्रारदाराकडे 80 हजार लाचेची मागणी केली.
त्यानुसार पहिला हफ्ता म्हणून 40 हजार रूपये सोमवारी देण्याचे ठरले. दुसरीकडे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी जि.प. मध्ये सापळा रचला. आरोग्य विभागाच्या ऑफीसमध्येच 40 हजारांची लाच घेताना शेख आणि बसमुंगे यांना रंगेहाथ पकडले.
या दोघांवर सदर बझार पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्यांनी केली.