अक्कलकोट : अक्कलकोट शहर व तालुक्यात आज सोमवारी ॲटीजन चाचणीमधून सात पॉझीटिव्ह आढळले आहेत. अक्कलकोट शहर तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या ४४८ इतकी झाली आहे.
आतापर्यंत अक्कलकोट शहरात दहा व ग्रामीण मध्ये सहा असे १६ मृत झाले असून ३१३ बाधित बरे झालेत. ११९ बाधितावर उपचार सुरू आहे. ॲटीजन चाचणीमधून १३ दिवसात एकूण २४३ रुग्ण पॉझीटिव्ह आढळले. त्यामध्ये सोमवारी सात रुग्ण आढळले आहे. अक्कलकोट शहरात बुधवार पेठ चार,म्हाडा काँलनी दोन असे सहा व ग्रामीण भागात समर्थ नगर एक असे एकुण सात रुग्णांचा समावेश आहे. संख्या साडे चारशेच्या जवळ गेली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘ टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारच्या चाचणीतून ६० निगेटिव्ह व सात पाजिटिव्ह आढळले. एकुण शहरातील ४७ व ग्रामीण भागातील ७२ असे एकुण ११९ बाधितावर उपचार सुरु आहे. त्यातील ८६ बाधित कोविड केअर सेंटरमध्ये आहेत तर फक्त ३३ खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
* तीन दिवस व्यापाऱ्यांसाठी मोफत चाचणी
प्रशासनाकडून २८ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये समर्थ हॉस्पिटल मैंदर्गी रोड अक्कलकोट येथे दुपारी १२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत कोव्हिड विषाणू संदर्भातील ॲटीजन चाचणी व्यापारी, दुकानदार यांच्या साठी विनामूल्य करून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अक्कलकोट शहर परीसरातील सर्व व्यापारी, भाजी विक्रेते, मेडिकल स्टोअर्स चालक, सराफ दुकानदार, आडत दुकानदार, शहरातील इतर व्यापारी व त्यांचा कामगार वर्ग यांना प्रशासनाकडून जाहीर आवाहन केले आहे.