सोलापूर : विविध मोबाईलवरून ‘आय लव्ह यु रानी’ यासह अनेक अश्लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विजय भालचंद्र मरिगुंड्डी (रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
होटगी रोडवर राहणार्या विवाहितेचा पती उस्मानाबाद येथे कामास आहे. त्यावेळी कामाच्या माध्यमातून त्याची आणि विजय मरिगुंड्डी याची ओळख झाली होती. दरम्यान विजय याने त्या इसमाच्या पत्नीचा मोबाईलनंतर मिळवला आणि जानेवारी महिन्यापासून विजयने मित्राच्या पत्नीला विविध मोबाईल नंबरवरून अश्लिल मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. फेब्रुवारी महिन्यात त्याने त्या विवाहितेला ‘आय लव्ह यु रानी’ असा मेसेज पाठवला.
त्यावेळी तिने ही बाब तिच्या पतीच्या कानावर घातली. पतीने मेसेज आलेल्यानंबरवर फोन केला असता हा नंबर विजयचा असल्याचे कळले. याच दरम्यान विवाहितेच्या सासूची तब्येत बिघडल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नाही. त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात विजयने पुन्हा विवाहितेला फोन करून अश्लिल मेसेज करत तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहिता आणि तिच्या पतीने विजापूर नाका पोलिसात विजय मरिगुंड्डी विरोधात फिर्याद दिली. तपास पो.स.ई. मस्के करत आहेत.
* आरोपीवर अनेक गुन्हे दाखल
आरोपी विजय भालचंद्र मरिगुंड्डी (रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोलापूरसह ग्रामीणच्या विविध पोलिस ठाण्यात खंडणी, अपहरण, विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जवळच्या नात्यातील मुलीचे अपहरण केल्याचाही गुन्हा दाखल आहे.