सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात 194 तर नवे रुग्ण आढळून आले तर पाच जणांचा मृत्यू झाला. आज पाच मृत्यूची भर पडल्याने दुर्देवानी ग्रामीणमध्ये कोरोनाबळीचे शतक पूर्ण झाले आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा 103 झाला आहे.
दिलासादायक म्हणजे आजच्या अहवालात तब्बल 708 निगेटिव्ह तर 151 जणांनी कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. आता ग्रामीणची एकूण कोरोना रुग्णसंख्या 3 हजार 653 झाली आहे तर मृतांची संख्या 103 झाली आहे.
आज शुक्रवारी सर्वाधिक 57 रूग्ण बार्शी तालुक्यात आढळले आहेत. शुक्रवारी पंढरपूर तालुक्यातील दोन बार्शी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
* तालुकानिहाय रूग्ण संख्या
अक्कलकोट 474 बार्शी 810, करमाळा 121, माढा 202 माळशिरस 216, मंगळवेढा 111, मोहोळ 242, उत्तर सोलापूर 285, पंढरपूर 506, सांगोला 111, दक्षिण सोलापूर 575.