सांगली : सांगली जिल्ह्यात गुरुवारी मनपा कार्यक्षेत्रामध्ये 134 नवीन रुग्ण, शहरी भागात 23 रुग्ण, ग्रामीण भागात 84 रुग्ण, आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2 हाजार 307 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे झालेली रुग्णसंख्या 1 हजार 33 वर पोहचली आहे.
उपचारा खाली 1 हजार 202 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 72 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. तसेच आज 81 रुग्ण कोरोना मुक्त ही झाले आहेत. आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 917, शहरी भागातील 178, मनपा क्षेत्रातील 1212 रुग्ण अशी आहे. ग्रामीण पेक्षा मनपा क्षेत्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजच्या नवीन पॉझिटिव्ह मध्ये आटपाडी तालुका 1,जत तालुका 16, कडेगाव तालुका 4, कवठेमंकाळ तालुका 3,खानापूर तालुका 4, मिरज तालुका 34, पलूस तालुका 20, शिराळा तालुका 2, तासगाव तालुका 12, वाळवा तालुका 11, सांगली 64 , मिरज 70 अशी आहे. मृतांमध्ये नळभाग सांगली येथील 68 वर्षांचा पुरुष, कृष्णाघाट सांगली येथील 59 वर्षांचा पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या –
आटपाडी 128, जत 142, कडेगाव 60, कवठेमहांकाळ 72, खानापूर 53,पलूस 103, शिराळा 184, तासगाव 69, वाळवा 119, मनपा 1 हजार 212 अशी आहे.