सांगली : सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केले होते. यामध्ये ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही अशा ८ जणांवर मिरज पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे.