नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमित वैद्यकीय चाचण्या आणि तपासणीसाठी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायंकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले. याआधीही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ही नियमित वैद्यकीय तपासणी असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या गोटातून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं.
राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्र आली आहेत. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली होती. अलीकडच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हीडिओ जारी करून त्या त्यांची मतं मांडताना दिसत आहेत.