अक्कलकोट : माजी गृहराज्यमंत्री तथा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील व दुधनी कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा दुधनी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे ( वय वर्षे ९० ) यांचे आज (शुक्रवारी) रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान वृद्धपकाळाने निधन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुधनी नगरपरिषदेत गेल्या ४९ वर्षे नगराध्यक्ष म्हणून म्हेत्रे कुटुंबाने कारभार पाहिले आहेत. फक्त सन २०१६ च्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून भाजपचे भिमाशंकर इंगळे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. अन्यथा गेल्या ४९ वर्षे दुधनी नगरपरिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. नगरपरिषद स्थापन झाल्यापासून काही वर्षे अपवाद वगळता कै. सातलिंगप्पा म्हेत्रे हेच स्वत: या नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून ३१ वर्षे सत्ता भोगले आहेत.
सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३१ रोजी झाला होता. त्यांचे आज निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी दुपारी दोन वाजता दुधनी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस कमिटीचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात ५ मुले, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रभावती ख्याडे, नागम्मा माळी, चंदम्मा माळी हे तीन मुली तर मल्लिनाथ म्हेत्रे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, काशीनाथ म्हेत्रे आणि शरणप्पा म्हेत्रे हे पाच मुले आहेत. यात काशीनाथ म्हेत्रे आणि शरणप्पा म्हेत्रे यांचे पूर्वीच निधन झाले.