सोलापूर : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात तयार करणे सुरु असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. त्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याकडून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती घेतली जात असल्याचे शेडगे यांनी सांगितले. विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळावरुन विष्णू सिद्राम गायधनकर (रा.भारत हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे.
तर आसरा चौकात बनावट नोटा चलनात आणण्याच्या हेतूने त्या नोटा वितरीत करणाऱ्या संजय धनु पवार (रा. कुमठा तांडा, उत्तर सोलापूर) यालाही आसरा चौकातून पोलिसांनी अटक केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बनावट नोटा छापणाऱ्या दोन तरुणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोन तरुणांकडून घरी बनावट नोटा प्रिंटर आदी साहित्य जप्त केले आहे. त्या दोघांनी आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या आणि त्यांनी या नोटा कोणाकोणाला सप्लाय केल्या याबाबतची अधिक माहिती पोलिस घेत आहेत.
भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात तयार करणे सुरु असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. त्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले.त्यांच्याकडून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी शंभर रुपयाच्या 610 व पाचशे रुपयाच्या 500 नोटा जप्त केल्या आहेत. तर भारत हौसिंग सोसायटी येथून, ज्या ठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणाहून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा कारवाई करताना जप्त करण्यात आल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली.