सिवनी : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील घंसौर विधानसभेच्या माजी आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. थोडक्यात त्यांचा बोलताना तोल सुटला. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी आमदार रामगुलाम उइके यांनी एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याबाबत वक्तव्य केल्याने वादात अडकण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोंगपा नेते रामगुलाम उइके म्हणाले की, इंदिरा गांधी यांना मारण्यासाठी गोळी मिळाली, राजीव गांधींना मारण्यासाठी बॉम्ब मिळाला पण नरेंद्र मोदी यांच्यासाठी कोणता बॉम्ब मिळाला नाही, का नाही नरेंद्र मोदींना उडवत? अशा शब्दात त्यांनी लोकांसमोर भडकाऊ भाषण केले आहे. गोंगपा नेत्याच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामगुलाम उइके येथे आमदार म्हणून निवडून आले होते. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिकिटावर त्यांना ५५ हजार ३८९ मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उर्मिला देवींचा पराभव केला. तथापि, विरोधी पक्षाच्या नेत्याने किंवा टीकाकारांनी पंतप्रधानांच्या मृत्यूसाठी प्रार्थना केलेली ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनेक विधान करण्यात आली आहेत.