पुणे : पुणे विमानतळावरुन रात्री होणारी सर्व उड्डाणे आणि विमाने यांच्या वेळेत बदली केली जातील. त्यामुळे रात्रीची 10 विमान उड्डाणं आता सकाळी होणार आहेत. रात्रीचे विमान उड्डाणे वर्षभरासाठी बंद केले जाणार आहे.
सप्टेंबरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवाश्यांची संख्या सुधारत आहे. मासिक आधारावर, ऑगस्टच्या तुलनेत यात 37 ते 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, वार्षिक आधारावर, सप्टेंबरमध्ये स्थानिक प्रवाशांची संख्या सुमारे 60 टक्क्यांनी घसरली आहे. आयसीआरएच्या म्हणण्यानुसार देशांतर्गत विमान कंपन्यांनीही आपली क्षमता वाढविली आहे.
पुणे विमानतळावर रात्री होणारे विमानांचे उड्डाण एक वर्षासाठी बंद राहील. याचे कारण आहे, धावपट्टी दुरुस्तीचे आणि रस्ता बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले की, धावपट्टीवर रस्ता तयार करण्याचे काम 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम रात्री केले जाईल, अशा परिस्थितीत धावपट्टीवरील विमानांचे कामकाज रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान बंद केले जाईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुलदीप सिंग असेही म्हणाले की, उड्डाणांचे कामकाज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरळीत पार पडेल. सिंग म्हणाले की, रात्री होणारी सर्व उड्डाणे आणि विमाने यांच्या वेळेत बदली केली जातील. त्यामुळे रात्रीची 10 विमान उड्डाणं आता सकाळी होणार आहेत.
सप्टेंबरमध्ये कंपन्यांनी ऑगस्टमधील 33 टक्के तुलनेत सुमारे 46 टक्के क्षमतेसह काम केले. जूनमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाने कंपन्यांना त्यांची क्षमता 45 टक्क्यांनी वाढविण्याची परवानगी दिली. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी ते 60 टक्के करण्यात आले. या व्यतिरिक्त मंत्रालयाने ऑगस्टच्या उत्तरार्धात विमान कंपन्यांना आणखी अनेक सवलती जाहीर केल्या. यात प्रवाशांना प्रवासादरम्यान अन्न, पॅकेज केलेले खाद्य आणि पेये देण्याची आणि करमणूक सेवा देण्यासही परवानगी देण्यात आली.