वेळापूर : वेळापूर (ता. माळशिरस) येथे ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीस वेळापूर पोलिसांनी काल (बुधवारी) पुण्यातून ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी केलीय.
डाॅ. नाईक हाॅस्पिटलच्या गेटजवळ भाऊसाहेब रामचंद्र मगर आणि त्यांचा मेहुणा कृष्णराव सुभाष चव्हाण (वय २९) हे दोघेजण गप्पा मारत थांबले होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर विमुल नामदेव पोरे (रा. वेळापूर) याने एक गोळीबार केला. नेम चुकल्याने पुढील अनर्थ टळला. विपूल पोरेने गोळीबार करुन पलायन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपीस पकडण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके नेमली.
वेळापूर पोलीस ठाण्याचे पथक व एलसीबी पथक यांनी आरोपीचा पाठलाग करून व माहिती काढून शोध घेतला असता त्यांना पिंपरी— चिंचवड येथील चिखली येथे गोळीबार प्रकरणातील आरोपी विपुल पोरे हा लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक त्या ठिकाणी जाऊन विपुल पोरे यास ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली.
त्याच्याकडे असणारी पिस्तूल वेळापूर पोलिसांनी जप्त केली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर सपोनि दीपक जाधव, पोलीस हेड.काॅ. दिलीप जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांच्या पथकाने केली. आरोपी विपुल पोरे यास माळशिरस न्यायालयासमोर उभे केले असता कोर्टाने विपुल पोरे यास सोमवार पर्यंत सहा दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.