जळगाव : रखवालदार आईवडील बाहेरगावी गेलेले असताना घरात एकटे झोपलेल्या चौघाही मुलामुलींची निर्दयी हत्या झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. शेतमालक हे आज सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. निर्दयीपणे हत्या करून नरसंहार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील शेख मुस्तफा शेख यांच्या केळी बागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.बिस्टान, जि.खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी मोटारसायकलीने बाहेरगावी गेलेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हा त्यांच्या घरात गाढ झोपलेल्या कु.सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५ वर्षे) या चौघाही मुला-मुलींची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या करून नरसंहार केल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यात शेतमालक शेख मुस्तफा हे सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. चौघांही चिमुरड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. चौघांचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.